भारतीयांनो तुम्हाला देशाबद्दल माहिती आहे का?

भारतीय नागरिकांना आपल्याच देशाबद्दल माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलेय. असमानता, नास्तिक लोकसंख्या, महिला रोजगार आणि इंटरनेटची व्याप्ती या मुद्द्यावर हे सर्वेक्षण करण्यात आले होते. लंडनस्थित मार्केट रिसर्च फर्म ipsos mori ने हे सर्वेक्षण केले होते. 

Updated: Dec 7, 2015, 05:23 PM IST
भारतीयांनो तुम्हाला देशाबद्दल माहिती आहे का? title=

लंडन : भारतीय नागरिकांना आपल्याच देशाबद्दल माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलेय. असमानता, नास्तिक लोकसंख्या, महिला रोजगार आणि इंटरनेटची व्याप्ती या मुद्द्यावर हे सर्वेक्षण करण्यात आले होते. लंडनस्थित मार्केट रिसर्च फर्म ipsos mori ने हे सर्वेक्षण केले होते. 

या सर्वेक्षणादरम्यान ३३ देशांतील २५ हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले. देशातील कोणत्या समस्येने चिंतीत आहात असे विचारले असता अनेकांना याचे उत्तरही देता आले नाही. 

देशाबद्दल अज्ञानता असलेल्या देशांच्या यादीत मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण कोरियातील नागरिकांनी योग्य उत्तरे दिली. कोरियापाठोपाठ आयरिशचा नंबर लागतो. 

यावेळी देशातील आघाडीवर असलेल्या १ टक्के लोकांच्या संपत्तीबाबतही भारतीयांना विचारण्यात आले. मात्र तेथेही ते अज्ञान दिसले. याव्यतिरिक्त लढ्ढपणा, प्रवासी, पालकांसोबत राहणे, महिला रोजगार, ग्रामीण जीवन, आणि इंटरनेच्या व्याप्तीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले मात्र याबाबत भारतीय अज्ञान असल्याचे जाणवले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.