नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकने आयसिसचे फेसबुक अकाउंट डिलीट केले. मात्र हे अकाउंट डिलीट केल्याप्रकरणी नंतर चक्क माफीही मागितली आहे. आता तुम्ही म्हणाल आयसिसचे अकाउंट डिलीट केल्यानंतर माफी का मागावी. अकाउंट डिलीट केले ही तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र हे अकाउंट आयसिस या दहशतवादी संघटनेचे नव्हते तर सँन फ्रँसिंस्कोमध्ये राहणाऱ्या तरुणीचे होते. तुम्हीही हैराण झालात ना?
Facebook thinks I'm a terrorist. Apparently sending them a screenshot of my passport is not good enough for them to reopen my account.
— Isis Anchalee (@isisAnchalee) November 17, 2015
सँन फ्रँसिंस्कोमध्ये पेशाने सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या आयसिस अंकली या तरुणीच्या नावावरुन फेसबुकचा सगळा गोंधळ झाला. तिचे फेसबुकवरील अकाउंट हे आयसिस दहशतवादी संघटनेचे समजून फेसबुकने हे अकाउंट डिसेबल करुन टाकले. त्यानंतर या तरुणीने आपण दहशतवादी नसून आयसिस हे आपले नाव असल्याचे फेसबुकला ट्विटरवरुन स्पष्ट केले.
@facebook I sent you my passport but it's not good enough for validation?
— Isis Anchalee (@isisAnchalee) November 17, 2015
तसेच पुराव्यासाठी तिने तिच्या पासपोर्टची कॉपीही फेसबुकला पाठवली. तसेच फेसबुकला सुनावलेही. सारख्या नावामुळे गोंधळलेल्या फेसबुकने नंतर तिची माफी मागितली आणि तिचे अकाउंट सुरु केले. अकाउंट पुन्हा सुरु कऱण्यासाठी आयसिसला तीनवेळा तिची वैयक्तिक माहिती फेसबुकला द्यावी लागली. या घटनेनंतर आयसिस नावाच्या अन्य व्यक्तींनीही नाराजी व्यक्त केली.
@facebook why would you disable my personal account? MY REAL NAME IS ISIS ANCHALEE /facepalm
— Isis Anchalee (@isisAnchalee) November 16, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.