जाणून घ्या `अ‍ॅलर्जी` विषयी

मला डॉक्टरांनी अॅलर्जी असल्याचं सांगितलंय, असं आपण नेहमी ऐकत असतो, मात्र सुरूवातीला अॅलर्जी म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Updated: May 6, 2014, 06:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मला डॉक्टरांनी अॅलर्जी असल्याचं सांगितलंय, असं आपण नेहमी ऐकत असतो, मात्र सुरूवातीला अॅलर्जी म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे.
अॅलर्जी म्हणजे काय?
माणसाचे शरीर जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी अती संवेदनाशील असते, जेव्हा त्या विशिष्ट गोष्टीने माणसाच्या शरीरावर काही प्रतिक्रिया दिसतात, अशी वेळी त्याला अ‍ॅलर्जी आहे असं म्हणतात.
अ‍ॅलर्जी ही बाब सहसा त्वचा, फुफ्फुसे, सूज तसेच खाणे-पिणे ह्या गोष्टींतून दिसून येते.
अ‍ॅलर्जीला मराठीत ’वावडं’ असं म्हणतात. एखाद्या गोष्टीचे वावडं असणे म्हणजेच अ‍ॅलर्जी.
मात्र आताच्या बदलत चाललेल्या बोली भाषेतही अ‍ॅलर्जी हा शब्द जास्त रुळला आहे. अ‍ॅलर्जी ही सर्वांमध्ये दिसून येत नसते. पण काहीजणांची प्रतिकार शक्ती एखाद्या पदार्थाला किंवा अ‍ॅलर्जी सदृष गोष्टींना प्रतिसाद देऊ शकत नाही, आणि त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या मार्गांनी दिसून येतात.
त्या अ‍ॅलर्जीक गोष्टीशी लढा देण्यासाठी शरिरातील बॅक्टेरिया, विशिष्ट विषाणू आणि टॉक्सिन्स सज्ज बनतात, मात्र त्याचे परिणाम माणसाच्या शरीरावरच दिसून येतात.
अ‍ॅलर्जी ही बऱ्याचदा आपल्या नेहेमीच्या खाण्याच्या पदार्थांपैकी किंवा सानिध्यात येणाऱ्या गोष्टींपैकीच कसली ना कसले होते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती (immune systeam) जेव्हा नेहमीच्या अपायकारक नसणाऱ्या गोष्टीला उलट प्रतिसाद देते, तेव्हा माणूस गोंधळून जातो.
आपल्याला अ‍ॅलर्जी आहे हे समजायलाच खूप वेळ जातो, त्यामुळे उपचार घेण्यास किंवा अ‍ॅलर्जी असणाऱ्या गोष्टीपासून दूर रहाण्यासही त्या व्यक्तीला उशीर लागतो, आणि तो पर्यंत त्या अ‍ॅलर्जिक गोष्टीचे परिणाम होत रहातो.
अ‍ॅलर्जी अनेक प्रकारची असते. आजच्या प्रदुषणयुक्त जगात बऱ्याच जणांना धुळीची अ‍ॅलर्जी असते, विशिष्ट औषधी परागकणांची असते. पण जास्तीत जास्त अ‍ॅलर्जी ही विशिष्ट खाद्यपदार्थाची असते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.