वेस्ट इंडिज महिला संघ ठरला टी-२० वर्ल्डकप विजेता

४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Updated: Apr 3, 2016, 05:55 PM IST
वेस्ट इंडिज महिला संघ ठरला टी-२० वर्ल्डकप विजेता title=

कोलकाता : ४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

सलामीवीर विलानी हिने ५२ तर लानिंग हिने ही ५२ रन्स केल्या आणि यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात पाच बाद १४८ धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार टेलरने ५९ तर मॅथिव्सने ६६ रन्सची चांगली खेळी करत हा विजय मिळवला.