पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Updated: Sep 26, 2016, 04:53 PM IST
पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी  title=

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं 159 रनवर एक विकेट गमावली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये आता भारताकडे 215 रनचा लीड आहे. 

दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुरली विजय 64 आणि चेतेश्वर पुजारा 50 रनवर खेळत आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा डाव 318 रनवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवसाअखेरीस 152 रनवर केवळ एक विकेट गमावली होती. तिसऱ्या दिवशी मात्र न्यूझीलंडच्या बॅट्समनची जडेजानं आणि अश्विननं दैना केली. जडेजानं न्यूझीलंडच्या पाच बॅट्समनना तर अश्विननं 4 बॅट्समनना तंबूत परतवलं.