मुंबई: दक्षिण आफ्रिकेची टीम २८ सप्टेंबरपासून ७२ दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात तीन टी -२०, पाच वनडे आणि चार टेस्ट मॅच होणार आहेत. त्यामुळं ऑक्टोबर-नोव्हेंबर हा महिना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.
सोमवारी बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्टाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या दौऱ्याची औपचारिक घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेची टीम तब्बल ७२ दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून आफ्रिकेचा आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा भारत दौरा आहे.
या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे दौऱ्यातील दुसरी टेस्ट मॅच बंगळुरु इथं होणार असून ही मॅच आफ्रिकेचा बॅट्समन ए बी डिव्हिलियर्सची १०० वी टेस्ट मॅच आहे. आयपीएलमध्ये डिव्हिलियर्स हा रॉयल चॅलेंजर बंगळुरुकडून खेळतो.
दौऱ्य़ाचं वेळापत्रक खालीलप्रमाणे
२९ सप्टेंबर - दिल्ली इथं दोन्ही टीममध्ये टी - २० प्रॅक्टिस मॅच होईल.
टी - २० मॅच सीरिज -
२ ऑक्टोबर - धर्मशाला
५ ऑक्टोबर - कटक
८ ऑक्टोबर - कोलकाता
पाच वनडे मॅचची सीरिज
११ ऑक्टोबर - कानपूर
१४ ऑक्टोबर - इंदौर
१८ ऑक्टोबर - राजकोट
२२ ऑक्टोबर - चेन्नई
२५ ऑक्टोबर - मुंबई
तीन टेस्ट मॅच सीरिज
५ ते ९ नोव्हेंबर - मोहाली
१४ ते १८ नोव्हेंबर - बंगळुरु
२५ ते २९ नोव्हेंबर - नागपूर
३ ते ७ डिसेंबर - दिल्ली
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.