सानिया - बार्बोराची मियामी ओपन फायनलमध्ये धडक

सानिया मिर्झा आणि तिची पार्टनर बार्बोरा स्ट्रीकोव्हानं मियामी ओपनची फायनल गाठलीय.

Updated: Apr 1, 2017, 11:57 PM IST
सानिया - बार्बोराची मियामी ओपन फायनलमध्ये धडक  title=

मियामी : सानिया मिर्झा आणि तिची पार्टनर बार्बोरा स्ट्रीकोव्हानं मियामी ओपनची फायनल गाठलीय.

सानिया-स्ट्रीकोव्हा जोडीनं 6-7, 6-1, 10-4 नं सेमी फायनलची लढत जिंकली. आता तिसऱ्या मानांकित सानिया-स्ट्रीकोव्हा जोडीचा मुकाबला बिगर मानांकित गॅब्रिएला डाबारोवस्की आणि झू यिफान जोडीशी होणार आहे.

2017 टेनिस सीझनमध्ये सानियानं दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. आता सानिया ही लढत जिंकत मिायामी ओपन जिंकते का ते याकडेच तमाम टेनिस चाहत्यांचं लक्ष असणार आहे.