आरएम लोढा कमिटीचा अहवाल सादर

आरएम लोढा कमिटीनं आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला. यामध्ये बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला अनेक सूचना देण्यात आल्यात. 

Updated: Jan 4, 2016, 02:00 PM IST
आरएम लोढा कमिटीचा अहवाल सादर title=

नवी दिल्ली : आरएम लोढा कमिटीनं आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला. यामध्ये बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला अनेक सूचना देण्यात आल्यात. 

आयपीएल फिक्सिंग संदर्भातील अंतिम अहवालही  सादर करण्यात आला. बीसीसीआय क्लीन अॅक्शन प्लॅन आणि सुंदर रमन यांच्या निलंबनाबाबतही अहवाल देण्यात आलाय. 

आता या अहवालात केल्या जाणा-या सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते याची उत्सुकता बीसीसीआयला आहे. 

निवृत्त न्यायाधीश आर.एम.लोढा, अशोक भान आणि रविंद्रन या त्रिसदस्यीय समितीकडे बीसीसीआयच्या कारभारात सुधारणा करण्यासाठीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.आयपीएल फिक्सिंगमुळे मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी बीसीसीआय सध्या प्रयत्नशील आहे.