Pushpa 2 Rashmika Mandanna : 'पुष्पा 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट काहीच दिवसात अर्थात 5 डिसेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. आज 30 नोव्हेंबर पासून आगाऊ बूकिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसत आहे. त्या दोघांनी या निमित्तानं आयोजित केलेल्या एका प्रेस मीटमध्ये हजेरी लावली होती. पण त्या आधी गोव्यात झालेल्या IFFI मध्ये रश्मिकानं तिच्या विषयीच्या एका अफेवर मौन सोडलं. ज्यात तिनं दावा केला की या चित्रपटानंतर सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
रश्मिका मंदानानं गोवामध्ये झालेल्या IFFI मध्ये फिल्म महोत्सव 2024 मध्ये 'पुष्पा 2' नंतर ती सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री असल्याच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. रश्मिकानं सांगितलं की 'ही गोष्ट मी मान्य करत नाही कारण हे खोटं आहे.'
दरम्यान, अनेक रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की 'पुष्पा' साठी रश्मिका मंदानाला 2 कोटी मानधन मिळालं. तर आता 'पुष्पा 2' साठी तिला 10 कोटी मानधन मिळालं. पण या बातमीवर रश्मिकानं नकार दिला आणि सांगितलं की यात काहीही तथ्य नाही.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये प्री-रिलीज कार्यक्रमांमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानानं 'सामी' गाण्याची हुक स्टेप केली. त्याशिवाय अल्लू अर्जुननं 'फायर' चा डायलॉग त्याच्या अंदाजात घेतला. 'फ्लावर नहीं, वाइल्ड फायर हैं'. दोघांना एकत्र स्टेजवर पाहून चाहते सुद्धा आनंदी झाले होते.
हेही वाचा : अभिनेत्रीचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवून फिरत होता नवरा; CCTV फुटेज पाहून पोलिसांना बसला धक्का
दरम्यान, अल्लू अर्जुननं एका प्रमोशनल कार्यक्रमात हिंट दिली आहे की 'पुष्पा 2' मध्ये रश्मिकाची भूमिका ही पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत खूप चांगली असणार आहे. ज्याची अपेक्षा कोणी केला नसेल. तर रश्मिकाविषयी बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला, नॅशनल क्रश. माझी श्रीवल्ली, रश्मिका एकटीच यावेळी संपूर्ण देशाला क्रश करणार आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा तिच्यावर क्रश होईल. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्याशिवाय हा चित्रपट पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत किती कमाई करणार यातकडे देखील लक्ष लागलं आहे.