Viral Banana चं सत्य : 520000000 रुपयांचं केळं विकत घेणाऱ्यानं अखेर खाऊन उलगडलं रहस्य!

The Most Expensive Banana In The World: जगातील सर्वात महागडं केळं, तब्बल 52 लाख डॉलरला विकलं गेलं आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 30, 2024, 12:42 PM IST
Viral Banana चं सत्य : 520000000 रुपयांचं केळं विकत घेणाऱ्यानं अखेर खाऊन उलगडलं रहस्य! title=
Man who bought duct-taped banana for Rs 52 crore eats it and say its iconic

The Most Expensive Banana In The World: गेल्या काही दिवसांपूर्वी भिंतीवर चिटकवलेल्या केळ्याचा फोटो व्हायरल झाला होता. हे केळ 62 लाख डॉलर्स म्हणजेच तब्बल 52.4 कोटी रुपयांत विकले गेले होते. मात्र, आता याबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर येत आहे. क्रिप्टोकरन्सी उद्योजक जस्टिन सन याने ही विचित्र कलाकृती खरेदी केली होती. या केळ्याचे मालकी हक्क सन याच्याकडे येताच त्याने हे केळ लगेचच खावून फस्त केले आहे. 62 लाख डॉलर्सचे केळं खाल्ल्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियाही कमाल होती. 

काय आहे प्रकरण?

भिंतीवर चिकटपट्टीने चिटकवेलेल्या केळं हे कलाकृती द कॉमेडियन या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले व्हिज्युअल आर्टिस्ट मॉरिझियो कॅटेलन यांनी निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे कॉमेडियन हेच नाव त्या कलाकृतीला देण्यात आलं आहे. कॉमेडियन हे फक्त एक साधे केळं असून 0.35 डॉलरला म्हणजे अवघ्या 29 रुपयांना खरेदी करण्यात आले होते. हे केळं रिकाम्या भिंतीवर डक्ट टेपने चिकटवले होते. 

या केळ्याचा लिलावासाठी प्रस्ताव मांडला होता. सुरुवातीला कॉमेडियनच्या लिलावाला 8 लाख डॉलर्सपासून सुरुवात झाली. त्यानंतर याची किंमत 52 लाखापर्यंत गेली. शेवटी 62 लाख डॉलर्स म्हणजेच 52.4 कोटी रुपयांत लिलाव करण्यात आला. क्रिप्टो उद्योजक जस्टिस सन यांनी शेवटची बोली लावून ही कलाकृती विकत घेतली. 

हाँगकाँगच्या एका महागड्या हॉटेलमध्ये लिलावप्रक्रिया पार पडली. लिलावानंतर जस्टिस सन यांनी सभागृहातच सर्व प्रेक्षकांसमोर डक्ट टेप उघडून ते केळं खाल्लं. केळं खाल्ल्यानंतर त्याने आयकॉनिक म्हणत हे इतर केळ्यांपेक्षा याची चव खूप चांगली आहे, असं म्हटलं आहे. तसंच, कला आणि क्रिप्टोकरन्सी यांच्यात एक समांतर रेषा आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे. 

<blockquote class="twitter-tweet" data-media-max-width="560"><p lang="zh" dir="ltr">许多朋友问我这根香蕉的味道如何。老实说,对于一根有如此故事的香蕉,味道自然和普通香蕉不一样。我品尝出了一种100年前大麦克香蕉的味道。 <a href="https://t.co/ddo8pEjatx">pic.twitter.com/ddo8pEjatx</a></p>&mdash; H.E. Justin Sun  (@justinsuntron) <a href="https://twitter.com/justinsuntron/status/1862513736801808497?ref_src=tws...">November 29, 2024</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

कॅटलिनने 2019मध्ये मियामीमधील आर्ट बासेल येथे पहिल्यांदा कॉमेडियनची संकल्पना मांडली होती. त्यानंतर तीनदा या कलाकृतीचा लिलाव पार पाडला होता. यात 1.20 आणि 1.50 लाख डॉलरमध्ये कलाकृती विकल्या गेल्या होत्या. तसंच, याबाबत वाददेखील झाला होता.