सिडनी : सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून शाब्दीक हल्ल्यांचा जोर वाढला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉनसननं सांगितलं की, सेमीफायनल मॅचमध्ये मी 'स्लेजर इन चीफ'ची भूमिका निभावणार आहे.
मैदानावर प्रतिस्पर्धी टीमवर शाब्दीक हल्ले चढवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टीमनं वर्ल्ड कपमध्ये मात्र संयम दाखवला आहे. मात्र त्या संयमाला विराम देत जॉनसननं आता कंबर कसली आहे.
जॉनसननं सांगितले की, डेविड अशा स्लेजिंगसारख्या गोष्टींमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. मात्र हे कोणाला तरी करावं लागेलच आणि त्यासाठी मी तयार आहे, हा तर खेळाचा एक भाग आहे. वहाब रियाज आणि वॉटसनमध्ये जे झालं ते अपेक्षितच होतं.
जॉनसनचं म्हणणं आहे की, अशा प्रकारानं खेळामध्ये एकप्रकारे मनोरंजन होतं. ऑस्ट्रेलिया-भारत सीरिजदरम्यान रोहित शर्माला इंग्रजीत बोलल्याबद्दल डेविड वॉर्नरला दंड भरावा लागला होता. तसंच भविष्यात असं न करण्याचा इशारही देण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.