१४४ वर्षांच्या क्रिकेटने १२ जणांचे घेतले प्राण...

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजेस याचे गुरूवारी निधन झाले. ह्युजेसला तीन दिवसांपूर्वी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागला होता. यानंतर तो मैदानावर पडला होता. एखाद्या खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले आहे, असे क्रिकेट इतिहास पहिल्यांदा झाले नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

Updated: Nov 28, 2014, 10:31 AM IST
१४४ वर्षांच्या क्रिकेटने १२ जणांचे घेतले प्राण... title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजेस याचे गुरूवारी निधन झाले. ह्युजेसला तीन दिवसांपूर्वी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागला होता. यानंतर तो मैदानावर पडला होता. एखाद्या खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले आहे, असे क्रिकेट इतिहास पहिल्यांदा झाले नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

१) फिलिप ह्युजेस (ऑस्ट्रेलिया ) – ह्युजेसला मंगळवारी शेफिल्ड शील्ड स्पर्धेत झालेल्या मॅचमध्ये डोक्याला चेंडू लागला. दोन दिवसांनी गुरूवारी त्याचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ह्युजेस केवळ २५ वर्षांचा होता. सीन एबॉटचा एक बाऊंसर चेंडू ह्युजेसच्या हेल्मेटच्या खालील भागातून घुसून डोक्याच्या खालच्या भागाला लागला. त्यामुळे तो पिचवरही पडला. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. 

२) डेरेन रँडॉल (दक्षिण आफ्रिका) – रँडॉल याचा मृत्यू ३२ वर्षी झाला. २०१३ मध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत फलंदाजी करताना त्याचे निधन झाले. पुल शॉट खेळताना चेंडून रँडॉलच्या डोक्याला लागला. त्या ठिकाणीच तो कोसळला. त्याला त्वरित हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. पण तेथे त्याचे निधन झाले. 

३) जुल्फीकार भट्टी (पाकिस्तान) – स्थानिक क्रिकेट खेळताना पाकिस्तानच्या या फलंदाजाच्या डोक्याला चेंडू लागला आणि पिचवरच कोसळला. त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. भट्टीचे वय केवळ २२ वर्ष होते. 

४) रिचर्ड ब्युमोंट (इंग्लड) ३३ वर्षीय ब्युमोंट २०१२मध्ये खेळताना मैदानात हृदयविकाराचा झटका आला होता. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. 

५) एल्क्विन जेनकिन्स (इंग्लड) २००९ मध्ये इंग्लडचे अंपायर जेनकिन्स हे एका लीग मॅचमध्ये अंपारिंग करीत होते. क्षेत्ररक्षकाने फेकलेल्या एका चेंडूत अपघाताने ७२ वर्षीय जेनकिन्स यांच्या डोक्याला लागला आणि डोक्याला लागल्या मारामुळे जेनकिन्स यांचा मृत्यू झाला. 

६) वसीम रजा (पाकिस्तान) – रजा यांचे निधन २००६ मध्ये सरेकडून खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने झाला. त्यांचे वय ५४ वर्ष होते. 

७) रमण लांबा (भारत)  - भारतीय क्रिकेटरचे निधन १९९८ मध्ये क्लब मॅच दरम्यान ढाकामध्ये फिल्डिंग करताना झाले. लांबाला डोक्याला जखम झाली होती. ३८ वर्षांचा लांबा डोक्याला जखम झाल्याने तीन दिवस बेशुद्ध होता, पण नंतर कधी शुद्धीवर आला नाही. 

८) इयान फोली (इंग्लड) – १९९३ मध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत डर्बीशरकडून खेळताना वर्किंगटनविरोधात फोली यांच्या डोळ्याखाली चेंडू लागला. पण ३० वर्षीय फोली याचे निधन उपचार दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने झाले. 

९) विल्फ स्लॅक ( इंग्लड) स्लॅक याचे ३४ वर्षाच्या वयात १९८९मध्ये गांबिया येथील स्थानिक क्रिकेटमध्ये पडल्याने निधन झाले. यापूर्वी मॅचमध्ये स्लॅक चार वेळा बेशुद्ध झाले होते. अनेक वेळा तपासणी केली तरी त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. 

१०) अब्दुल अजीज (पाकिस्तान) १९५९ मध्ये कराचीमध्ये एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत फलंदाजी करताना १८ वर्षीय अजीज याच्या छातीत चेंडू लागला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले. 

११) अँडी डुकाट (इंग्लड) लॉर्ड्स मध्ये १९९४२ मध्ये एका सामन्यात ५६ वर्षीय डुकाट यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. 

१२) जॉर्ज समर्स (इंग्लड) – एमसीसी विरुद्ध लॉर्डसमध्ये १८७० मध्ये नाटिंघमशरकडून खेळण्यात आलेल्या एका सामन्यात २५ वर्षीय समर्स याच्या डोक्याला मार लागला. समर्स याने कोणताही उपचार घेतला नाही. घरी परतले पण चार दिवसांनी त्यांचे निधन झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.