नवी दिल्ली : 'जंटलमन गेम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटला काळिमा फासणारी एक घटना आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात घडलीय. रणजी सामना सुरु असताना दोन संघांचे कर्णधार एकमेकांना भिडताना आज प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
फिरोजशाह कोटला मैदानावर आज दिल्ली विरुद्ध पश्चिम बंगाल असा रणजी सामना रंगला होता. काही कारणावरून दोन्ही टीम्सचे कर्णधार गौतम गंभीर आणि मनोज तिवारी एकमेकांच्या समोरसमोर आले... इतकंच नाही तर त्यांनी मैदानातच एकमेकांना हाणामारीही केली.
त्यानंतर, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंच के. श्रीनाथ यांनाही गौतम गंभीरनं धक्काबुक्की केली.
का सुरू झाला वाद?
मैदानावर मनोज तिवारी कॅप घालून उतरला होता... पण, फास्ट बॉलर समोर असल्याचं पाहून त्यानं आपली हेल्मेट मागवलं... त्यावर दिल्ली रणजी टीमनं आक्षेप घेत तिवारी जाणून बुजून वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय...
यावरून दिल्लीचे बॉलर्स आणि त्यांचा कॅप्टन गंभीर मनोज तिवारी जवळ पोहचले... त्यांच्यात थोडा वादही झाला... आणि यावेळी गंभीरनं तिवारीला 'शाम को मिल... तुझे मारुंगा...' अशी हूलही दिली...
यावर, तिवारीनं 'शाम क्या अभी बाहर चल...' असं प्रत्युत्तर त्याला दिलं आणि वाद वाढला... यावेळी, पंचांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, चिडलेल्या गौतम गंभीरनं त्यांनाही धक्काबुक्की केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.