कटक : कटक मैदानाचा स्थानिक क्युरेटरने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाचनंतर मैदानात दव पडते आहे. मॅचच्या दिवशीही असं झाल्यास टॉस जिंकल्यावर फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने निकाल लागू शकतो.
क्युरेटर पंकज पटनायक यांच्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून मैदानात दव पडत आहेत. रासायनिक स्प्रे, दोन सुपर सोपर आणि मैदानाची दोरीचा वापर आउटफिल्ड सुखविण्यासाठी केला जात आहे. आउटफिल्डचे गवत कापून आठ मिलीमीटरवरून सहा मिलीमीटर करण्यात आले आहे. त्यामुळे दवबिंदू लगेच मातीत जातील.
मागील आंतरराष्ट्रीय सामना दोन वर्षांपूर्वी झाला होता. यात भारताने पाच विकेटच्या मोबदल्यात ३६३ धावा केल्या होत्या. मोबदल्यात श्रीलंकाचा संघ १६९ धावांमध्ये गारद झाला होता.
त्यामुळे भारताने टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी ही भारताच्या फायद्याची असणार आहे.