नवी दिल्ली : खेळाच्या मैदानावर एकापेक्षा एक विक्रम बनतात आणि लगेच तुटतातही... नुकतेच भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळण्यात आलेल्या वन डे सिरीजमधील एका सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक अद्भूत, अद्वितीय रन आऊट केला.
धोनीने स्टंपकडे पाठ करून न पाहता स्टंप उडविले आणि रॉस टेलरला बाद केले.
या कारनाम्यानंतर काही दिवसातच रणजी ट्रॉफीत आंध्रप्रदेश आणि पंजाब दरम्यान सामन्यात असाच एक फलंदाज बाद करण्यात आला. विकेट किपरने हातात चेंडू आल्यावर त्याने स्टंपकडे पाठ असताना न पाहतात स्टंप उडविले आणि फलंदाजा बाद केले. असे करून त्याने धोनीच्या रन आउटला रिपीट केले.
Watch Andhra keeper @KonaBharat effect an amazing stumping of Punjab's Jiwanjot Singh. @ranjiscores @BCCIdomestic pic.twitter.com/PypDP1kAg9
— Circle of Cricket (@circleofcricket) November 21, 2015
Watch the Mahi magic on loop #INDvNZ https://t.co/btMoJF0xC3
— BCCI (@BCCI) October 26, 2016