गेल वादळ, उत्तुंग षटकार ठोकत शतक....त्यानंतर मैदानावर डान्स तडका

आयपीएल २०१५मध्ये ख्रिस गेल वादळ पाहायला मिळाले. त्यांने केवळ ४६ बॉलमध्ये ११ षटकार आणि ५ चौकार ठोकत शतक झळकावले. त्यानंतर ख्रिस गेलने मैदानावर डान्स करत आनंद साजरा केला.

Updated: May 7, 2015, 01:15 PM IST
गेल वादळ, उत्तुंग षटकार ठोकत शतक....त्यानंतर मैदानावर डान्स तडका title=

मुंबई : आयपीएल २०१५मध्ये ख्रिस गेल वादळ पाहायला मिळाले. त्यांने केवळ ४६ बॉलमध्ये ११ षटकार आणि ५ चौकार ठोकत शतक झळकावले. त्यानंतर ख्रिस गेलने मैदानावर डान्स करत आनंद साजरा केला.

गेलने शतक झाल्यानंतर आनंदात मैदानात बॅट खाली ठेवली आणि दोन हात हवेत वर केले आणि उडी मारली. यावेळी थोडा डान्स करत आपणच शेर असल्याचे दाखवून दिले. या डान्सचा अनुभव क्रिकेट रसिकांनी अनुभवला. 

२०१५ मधील गेलचे हे पहिले शतक आहे. मात्र, आतापर्यंत त्याचे हे ५ वे शतक आहे. या शतकारनंतर तो सर्वाधिक शतक ठोकणारा खेळाडू ठरलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.