www.24taas.com,मुंबई
लंडन ऑलिंम्पिकमध्ये जमैकाच्या उसेन बोल्टनं शंभर मीटर पाठोपाठ २०० मीटरच्या शर्य़तीतसुध्दा गोल्ड मेडल पटकावलयं. त्याची वाऱ्याशी स्पर्धा असल्याचे दिसून आले.
बोल्टनं ही शर्यत १९ पूर्णांक ३२सेकंदात जिंकली. तर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी योहान ब्लॅकला दुस-या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. ब्लेकन १९.४४ सेकंदाची वेळ नोंदवली. तर वियर वॉरन तिस-या क्रमांकावर राहिला. या शर्य़तीचं वैशिष्ट्ये म्हणजे २०० मीटरमधील तीनही पदकं जमैकाच्याच एथलिट्सने पटकावलीयेत.
बिजिंगमध्ये जमैकाच्या खेळाडूंनी अशीच कामगिरी केली होती. लंडनमध्ये त्याची पुनरावृत्ती करत जमैकाच्या खेळाडूंनी आम्हीच सर्वोत्तम धावपटू असल्याचं दाखवून दिलयं. ही कामगिरी करताना त्याच्या जवळपास कोणीही नव्हते. आपणच रनचा बादशहा असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.