www.24taas.com, झी मीडिया, गेवराई
बीड जिल्ह्यातल्या गेवराईतले शिक्षक राजेंद्र घाडगेच्या हत्येप्रकरणी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेला अटक करण्यात आलीय. घाडगे यांची शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
१५ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातूनच शिंदे यांनी या हत्येची सुपारी दिली अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणातला आणखी एक आरोपी दत्तात्रय चौधरीच्या अटकेसाठी बीड पोलीस औरंगाबादला रवाना झालेत.
राजेंद्र घाडगे यांना मागील आठ दिवसांपासून धमकीचे फोन येत होते. तशी तक्रारही त्यांनी गेवराई पोलिसात दिली होती. घाडगे हे काल रात्री साडेनऊच्या सुमारास एक कार्यक्रम आटोपून बीडवरून गेवराई आले होते. ते सरस्वती कॉलनीतील सेंट झेवियर्स शाळेजवळ आले असता, दोन-तीन अज्ञातांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यावेळी जबर जखमी झालेल्या घाडगे यांना उपचारासाठी बीड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.