मनविसेच्या महानगर अध्यक्षाला चरस विकताना अटक!

अकोला मनविसेच्या महानगर अध्यक्षाला चरस विकताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ललित यावलकर असं या महानगर अध्यक्षाचं नाव आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 29, 2013, 12:08 AM IST

www.24taas.com, अकोला
अकोला मनविसेच्या महानगर अध्यक्षाला चरस विकताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ललित यावलकर असं या महानगर अध्यक्षाचं नाव आहे. त्यांच्याकडून 290 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलंय.
एकीकडे राज ठाकरे आपल्या भाषणांमधून मनसेचा स्वीकार करा असं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करत आहेत. मात्र त्याच वेळी जनतेच्या अपेक्षांना तडा देणाऱ्या घटनाही मनसैनिकांकडून घडत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षच आता चरस विकताना पकडले गेले आहेत. ललित यावलकरांना चरस विकताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. त्यांच्याकडून 290 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलंय.
दरम्यान, राम कदम यांच्याही अडचणींत वाढ झाली आहे. सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. यांसारख्या घटनांमुळे मनसे पक्षावरील विश्वासाला तडा जाण्ययाची शक्यता निर्माण होते. निवडणुक जवळ आली असताना अशा घटना जनतेसमोर आल्याने संभ्रम निर्माण होतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावर प्रतिक्रिया देणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

यांसारख्या घटनांमुळे मनसे पक्षावरील विश्वासाला तडा जाण्ययाची शक्यता निर्माण होते. निवडणुक जवळ आली असताना अशा घटना जनतेसमोर आल्याने संभ्रम निर्माण होतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावर प्रतिक्रिया देणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.