पोलिसांना अजूनही ध्वनीमापक यंत्र का दिली नाहीत?

उत्सवांच्या आधी राज्यातील सर्व पोलिसांना ध्वनिमापक यंत्रे मिळायला हवीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले होते. 

Updated: Oct 20, 2016, 06:57 PM IST
पोलिसांना अजूनही ध्वनीमापक यंत्र का दिली नाहीत? title=

मुंबई : उत्सवांच्या आधी राज्यातील सर्व पोलिसांना ध्वनिमापक यंत्रे मिळायला हवीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले होते. 

हे आदेश देवून ही गणेशोत्सव आणि नवरात्री दरम्यान ध्वनी प्रदुषणाच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या पण त्यावर कारवाई का नाही केली? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केलाय. 

तसंच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने राज्याचे अतिरिक्त गृहसचिव के पी बक्षी यांच्याविरोधात कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईचे संकेत देखील हायकोर्टाने दिलेत. मुंबई पोलिसांकडे अजुनही ध्वनी मापक यंत्रे उपलब्ध नाहीत. 

न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही प्रशासनाने ध्वनी मापक यंत्रांची खरेदी केली नाहीये. ही यंत्रे खरेदीत राज्य सरकार जाणूनबूजून दिरंगाई करत असल्याच संताप देखील आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने व्यक्त केलाय.