www.24taas..com, झी मीडिया, मुंबई
शरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. आपल्या जोडीदाराला जाणीवपूर्वक शारीरिक सुख नाकारणे हा त्या जोडीदाराचा मानसिक छळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्ती विजया कापसे ताहिलरामानी आणि न्यायमूर्ती पी. एन. देशपांडे यांनी हा निर्णय देतानाच गिरगाव येथे राहणार्या शैलेश याचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्याच्या कुटुंब न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. पत्नी आपल्याला शारीरिक सुख देत नाही. शारीरिक सुखाची मागणी केल्यामुळे तिने आपल्याविरुद्ध हुंडा मागितल्याची खोटी तक्रार दाखल केली, असे शैलेश यांने तक्रारीत म्हटले होते.
आपल्याविरुद्ध खोटी तक्रार नोंदवून हुंडा मागितल्याच्या आरोपाखाली संपूर्ण कुटुंबाला पोलीस कोठडीत पाठविले. फक्त एक महिना टिकलेल्या आपल्या वैवाहिक आयुष्यात आपल्या पत्नीने फक्त एकदाच आपल्याला शरीरसुख दिले. पत्नीकडून आपल्याला शारीरिक सुख मिळत नसल्याने आपल्याला तिच्यापासून घटस्फोट देण्यात यावा, अशी मागणी शैलैशने कुटुंब न्यायालयात केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.