मुंबईच्या मस्त्यप्रेमींसाठी खुशखबर

अडीच वर्षांपासून नुतनीकरणाच्या कारणामुळे बंद असलेलं मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालय अखेर 27 फेब्रुवारीला पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. 

Updated: Feb 20, 2015, 12:36 PM IST
मुंबईच्या मस्त्यप्रेमींसाठी खुशखबर title=

मुंबई : अडीच वर्षांपासून नुतनीकरणाच्या कारणामुळे बंद असलेलं मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालय अखेर 27 फेब्रुवारीला पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. 

मत्सालयावर अखेरचा हात फिरवला जात असून मत्स्य-व्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी आज या मत्सालयाची पाहणी केली. सुमारे 21 कोटी रूपये खर्चून नुतनीकरण करण्यात आलंय. 

या मत्सालयात 400 विविध प्रकारच्या माशांच्या जाती ठेवण्यात आल्या आहेत. खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या माशांच्या 200 तर गोड्या पाण्यात आढळणाऱ्या 200 जाती ठेवण्यात आल्या आहेत. 

टच फूल, स्टार फिश, सी अर्चिंनसारख्या माशांना प्रत्यक्षात पाहण्याची आणि हात लावण्याची संधी मिळणार आहे. जेली फिशसाठी वेगळी जागा देण्यात आली आहे. 

उद्घाटनाच्या दिवशी तारापोरवाला मत्यालयात सर्वसामांन्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.