दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: शिवसेना आमदार राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेले दिसत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना सन्मान मिळत नसेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी सेना आमदारांनी केलीय.
विधानभवनात यासंदर्भात सेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीत ही मागणी करण्यात आली. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर सरकारमधून बाहेर पडू, अशी भूमिका मंत्र्यांनी घेतलीय.
शिवसेनेचे मंत्री भाजपाच्या कारभारावर नाराज झाले आहेत. भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकार न दिल्यानं शिवसेनेचे राज्यमंत्री नाराज आहेत. शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या खात्याचे निर्णयही परस्पर होत असल्यानं नाराजी आणखी वाढलीय.
भाजपाचे पालकमंत्री शिवसेनेच्या आमदारांना समित्यांमध्ये स्थान देत नाहीत. उद्या शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आमची कामं होणार नसतील तर आम्ही सरकराला सहकार्य करणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेना आमदारांनी घेतलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.