गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ

भाजप-शिवसेना य़ुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला. भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दहा मंत्र्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात मंत्रीपदाची शपथ घेतली.

Updated: Dec 5, 2014, 09:48 PM IST
गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ title=

मुंबई : भाजप-शिवसेना य़ुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला. भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दहा मंत्र्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात मंत्रीपदाची शपथ घेतली. यात भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी पाच जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब उपस्थिती लावली. शपथविधी सोहळ्याला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते. तर भाजपचेही राज्यातले सर्व नेत्य़ांनी उपस्थिती लावली होती.
 
भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी ५ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. शिवसेनेच्या १० कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी विधान भवन परिसरात पार पडला. याप्रसंगी शिवसेना मंत्र्यांनी शपथ घेताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवर्जुन स्मरण केलं. शपथविधी सोहळ्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. 

युती सरकारच्या शपथविधी सोहळ्यातील सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली ती विरोधकांसह मित्रांची अनुपस्थिती... मंत्रिमंडळ विस्तारात सामील न केल्याने रासपच्या महादेव जानकरांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोतांनी अनुपस्थित राहणं पसंत केलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या सोहळ्याकडे पाठ फिरवली. रिपाइं आणि शिवसंग्रामच्या विनायक मेटेंनी मात्र शपथविधी सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.

@ दुपारी ४ वाजता

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार शुक्रवारी दुपारी ४ वाजता पार पडला. यामध्ये शिवसेनेच्या १० आणि भाजपच्या १० नेत्यांनी शपथ घेतली.
* गिरीश बापट यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ 
* गिरीश महाजन यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । खान्देशातील गुजर चेहरा, जामनेरचे आमदार, सलग पाचव्या विधानसभेवर
* दिवाकर रावते यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । शिवसेनेचे विधान परिषद आमदार । युतीच्या काळात होते कॅबिनेट मंत्री
* सुभाष देसाई यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते । उद्धव ठाकरेंचे विश्वासू
* रामदास कदम यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । युतीच्या काळात राज्यमंत्री । शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख । २००९ च्या पराभवानंतर विधान परिषद
* एकनाथ शिंदे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । कोपरी पाचपाखाडीचे आमदार । शाखा प्रमुख ते विरोधी पक्ष नेते पदापर्यंतचा प्रवास
* चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री शपथ । नागपूर ग्रामीणचे आमदार
* बबनराव लोणीकर यांनी घेतली कॅबिनेट मंत्री शपथ । परतूरचे आमदार । तिसऱ्यांदा विधानसभेवर । मराठवाड्याचे संतुलन राखण्यासाठी मंत्री पद देण्यात आले
* डॉ दीपक सावंत यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । शिवसेनेचा उच्चशिक्षित चेहरा । विधान परिषदेचे आमदार
* राजकुमार बडोले यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ । भंडारा जिल्ह्यातील जुने नेते । अर्जुनी मोरगावचे आमदार । नितीन गडकरींचे समर्थक
* राम शंकर शिंदे यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । धनगर समाजाचे नेते । नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे आमदार । आहिल्यादेवीच्या माहेर असलेल्या शिंदे घराण्याचे वंशज
* विजयकुमार देशमुख यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । भाजपचे लिंगायत समाजाचे आमदार । सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील आमदार। सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर ।
* संजय राठोड यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । यवतमाळ दिग्रस मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार । बंजारा समाजातील आक्रमक नेते । सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवड
* दादा भूसे यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । मालेगावातून तिसऱ्यांदा सेनेकडून विजयी । २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवड । नाशिकला भुसेंच्या रुपाने प्रतिनिधीत्व
* विजय शिवतारे यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । शिवसेनेचे पुरंदरचे आमदार । शरद पवारांचे कट्टर विरोधक । शिवसेनेचा ग्रामीण चेहरा । कृषी विषयाचे जाणाकार । २००९ मध्ये पहिल्यांदा पुरंदरमधून विधानसभेवर
* दीपक केसरकर यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । सावंतवाडीतून दुसऱ्यांदा विधानसभेवर । पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आणि आता सेनेकडून आमदार । नारायण राणेंचे कट्टर विरोधक ।
* राजे अमरिश अत्राम यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । गडचिरोली आहेरीचे भाजपचे आमदार । आदिवासी समाजाचे नेते । लंडनमधून बिझनेस लॉ आणि ह्युमन रिसर्चची पदवी
* रविंद्र वायकर यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । जोगेश्वरीतून शिवसेनेकडून दुसऱ्यांदा विधानसभेवर । उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकारी । चारवेळा मुंबईचे नगरसेवक ।
* रणजीत पाटील यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपचे आमदार । डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करतात
* प्रविण पोटे पाटील यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ । विधानसभेवर भाजपकडून पहिल्यांदा निवड । अमरावतीतील प्रमुख बिल्डरांपैकी एक नाव । गडकरींच्या जवळचे नेते । २०१२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर

 

@ दुपारी ३.४५ वाजता 

- राज्यात युतीचे सरकार
- विधानभवन प्रांगणात शपथविधी सोहळा
- उद्धव ठाकरे कुटुंबीयांसहीत उपस्थित
- शपथविधीसाठी सेना नेते दाखल
- शपथविधीसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित

 

@ दुपारी ३.१५ वाजता

- घटक पक्षांचा या विस्तारामध्ये सहभाग असणार नाही. - मुख्यमंत्री फडणवीस
- मी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोललो आहे. 
- त्यांना तसं सांगितले आहे. मित्रपक्ष काही नाराज नाहीत. 

@ दुपारी ३.१३ वाजता

- मित्र पक्ष ते आहेत. आमचे ते घटक पक्ष आहेत. त्यांना सोबत घेऊनच काम करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@ दुपारी ३.१२ वाजता

- आम्ही कोणाला नाराज केलेले नाही. निमंत्रण पाठविलेले आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- घटक पक्षांना निमंत्रण पाठवली आहेत. त्यांच्याशी संवाद केला जातोय 

@ दुपारी ३.११ वाजता

- दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रयत्न
- स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार प्रयोग राबवणार
- या डिसेंबरच्या अगोदर ही योजना सुरू करणार 
- जलसंधारण संदर्भातील सर्व योजना एकत्र करून जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून राबवणार - सीएम
- अण्णा हजारे, पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन
- जलयुक्त शिवार अभियान राबविणार

@ दुपारी ३.१० वाजता

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरु

मुंबई : भाजप राज्यमंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार होत आहे. या सरकारमध्ये शिवसेनेचे १० नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत काहीच प्रतिसाद नाही. तसेच त्याचवेळी भाजपचे मित्रपक्ष निमंत्रण नसल्याने नाराज झालेत.

दरम्यान, विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याच्या मंडपाची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. सुमारे अडीच हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.

तळ कोकणात शिवसेनेचं नेतृत्व करणाऱ्या दीपक केसरकरांवर राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेचे नेत रामदास कदम यांच्याकडे पर्यावरण, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे एमएसआरडीसी, दीपक सावंत यांच्याकडे आरोग्य, सुभाष देसाईंना उद्योग, तर दिवाकर रावतेंकडे परिवहन खात्यांची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून माहिती देण्यात आली.

@ दुपारी १२ वाजता

- विरोधी पक्ष पदाचा एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

@ सकाळी ११.४० वाजता

- मला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळाले नाही, मंत्रीपद मागायला जाणार नाही - महादेव जानकर

@ सकाळी ११.३० वाजता

- सदाभाऊ खोत घरी माघारी फिरलेत
- महादेवर जानकर, राजू शेट्टी यांना निमंत्रण नसल्याने नाराजी
- भाजपचे मित्रपक्ष नाराज

@ सकाळी ११ वाजता

- एकनाथ शिंदे देणार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा

भाजप-शिवसेना युतीत सेनेचे हे असणार या खात्याचे मंत्री?

मुंबई : भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार आज सायंकाळी होणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे बारापैकी दहा मंत्री शपथ घेणार आहेत. यात पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेनेला कमी महत्वाची खाती मिळाली आहेत.

शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळत आहे. यात पराभूत झालेले सुभाष देसाई यांना संधी देण्यात आली आहे. तर रामदास कदम यांनी निवडणूक लढविलेली नसताना त्यांनाही संधी देण्यात आली आहे.

रामदास कदम, दीपक सावंत, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळत आहे. मात्र, राज्यमंत्री पदाची लॉटरी कोणाला लागते यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. शिवसेनेमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढल्याचे दिसत आहे.

ही असणार शिवसेनेकडे मंत्रिपदे

> रामदास कदम - पर्यावरण
दीपक सावंत - आरोग्य
सुभाष देसाई - उद्योग
दिवाकर रावते - परिवहन
एकनाथ शिंदे - रस्ते विकास (एमआरडीए)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.