शाहरुख खानने दिल्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. रेड चिली या कंपनीने  सामना वृत्तपत्रात शुभेच्छांची जाहिरात दिली आहे. रेड चिली ही शाहरुख खान आणि गौरी खान यांची कंपनी आहे. 

Updated: Jul 27, 2016, 12:05 PM IST
शाहरुख खानने दिल्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. रेड चिली या कंपनीने  सामना वृत्तपत्रात शुभेच्छांची जाहिरात दिली आहे. रेड चिली ही शाहरुख खान आणि गौरी खान यांची कंपनी आहे. 

माय नेम इस खान सिनेमादरम्यान शिवसेना आणि किंग खान यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये तणावाचं वातावरण होतं पण शाहरुखच्या या शुभेच्छानंतर वाद संपतील असं म्हणायला हरकत नाही.