मुंबई: भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केलंय. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल आज निवृत्त होत आहेत.
CM @Dev_Fadnavis approves the appointment of Shri Praveen Dixit as the new Director General of Police, Maharashtra
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 29, 2015
आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विजय कांबळे असतील. ते आधी महामंडळ सुरक्षा विभागाचे प्रमुख होते. तर दुसरीकडे पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक अरुप पटनायक सेवानिवृत्त होत असल्यानं त्यांच्या जागी सतीश माथूर यांची नियुक्ती झाली आहे. विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर यांना प्रमोशन देण्यात आलंय.
आणखी वाचा - लाच घेणाऱ्यांनो सावधान! आता तुमचा फोटो फेसबुकवर!
प्रवीण दीक्षित यांचं कार्य -
- प्रवीण दीक्षित हे १९७७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.
- एसीबीचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी गेल्या दोन वर्षांत भ्रष्ट आणि लाचखोरांविरुद्ध धडक मोहीम उघडली.
- दीक्षित पुढच्या वर्षी ३१ जुलैला सेवानिवृत्त होतील.
- त्यांना महासंचालकपदाचा १० महिन्यांचा कालावधी मिळेल.
आज दुपारी पोलीस मुख्यालयात दयाल यांच्याकडून दीक्षित पदभार स्वीकारतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.