शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पवार काका-पुतणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मराठवाड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Updated: Jun 2, 2015, 02:16 PM IST
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पवार काका-पुतणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला title=

मुंबई: मराठवाड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

पवार यांनी नुकताच मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा केलाय. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही मागण्या सरकारकडे केल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत बघुयात... 

- मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यातील  शेतक-यांचे पीक कर्ज माफ करावे
- फळबागा वाचविण्यासाठी प्रतिहेक्टर ३५ हजारांची मदत द्यावी
- शेतक-यांच्या दूधाला जादा दर द्यावा. २० रूपये प्रतिलिटर ही आधारभूत किंमतीपेक्षा अधिक दर देवून त्याची अंमलबजावणी करावी
- रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेशी संलग्न घालून सुरू करावी
- जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा
- पीक विमा उतरवलेल्या शेतक-यांना नुकसाऩ भरपाई संबंधित कंपन्यांकडून घेवून द्यावी
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी माफ करावी
- शेतकऱ्यांना वीजबीलात सवलत मिळावी
- पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

राष्ट्रवादीच्या या मागण्यांवर आधीच कार्यवाही सुरू झाल्याचं सांगत याची माहिती आपण शरद पवारांना दिल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.