मुंबईत रेल्वेच्या धडकेत चार कामगार ठार, प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

कुर्ला - विद्याविहार रेल्वे स्थानका दरम्यान पहाटे झालेल्या अपघातात चार रेल्वे कामगारांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिलेत.

Updated: Feb 19, 2016, 06:26 PM IST
मुंबईत रेल्वेच्या धडकेत चार कामगार ठार, प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

मुंबई : कुर्ला - विद्याविहार रेल्वे स्थानका दरम्यान पहाटे झालेल्या अपघातात चार रेल्वे कामगारांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिलेत.

 

श्रावण वारे, गोकुळ पोकळे, काशिनाथ बगे आणि नाना सावंत अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावं आहेत. कर्जत- सीएसटी ही लोकल विद्याविहारहून कुर्ल्याकडे जात असताना पहाटे हे चार रेल्वे कर्मचारी ट्रॅक ओलांडत होते. यावेळी समोरून येणारी लोकल न दिसल्यानं अपघात झाला.

 

लोकलच्या धडकेनं या चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिलाय. या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिलेत. हे चार कामगार ट्रॅकवर काय करत होते. यांनी लोकलला सिग्नल दिला होता का, लोकलच्या मोटरमनला हे चौघे दिसले होते का? या प्रश्नांची उत्तरे या चौकशीतून समोर येतील असं रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.