मुंबई : मुंबई उडवून देण्याची धमकी अल क़ायदा या दहशतवादी संघटनेनं दिली असून, गणेशोत्सवात कार बॉम्बनं घातपात घडवण्याची योजना अल कायदानं आखली होती ती अजूनही क़ायम असल्या़चा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी केला आहे.
यासाठी मुंबईत गर्दीच्या ठिकाणी गाड्या पार्किंग करू न देण्याचे आदेश राकेश मारीया यांनी पोलिसांना दिलेत. त्याचबरोबर १०० पेक्षा जास्त अतिसंवेदनशील ठिकाणं पोलिसांनी शोधून काढलेत ज्या ठिकाणांना अल क़ायदा ही दहशतवादी संघटना टार्गेट करू शकते.
गणेशोत्सवात ५० हज़ार मुंबई पोलीस, एनजीओ, एसआरपी, पॅरामिलेक्टरी फ़ोर्स आणि सतर्क मुंबईकरांमुळे गणेशोत्सव सुरक्षित पार पडला. हे सहकार्य क़ायम ठेवल्यास मुंबईत दहशतवादी संघटना घातपात घडवू शकत नाही अशी विनंती देखील राकेश मारीया यांनी केली. त्यामुळे झी मीडीया ही सर्व प्रेक्षकांना आवाहन करत आहे. सावध राहा आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा, तुम्ही स्वत: सावध राहिल्यास मुंबई सदैव सुरक्षित राहिल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.