पावसाने मुंबईतून बाय बाय केले!, ऑक्टोबर हिटचे चटके

राज्यात परतीचा पाऊस कधी जाणार याची उत्सुकता होती. मात्र, मान्सूनने मुंबईकरांचा निरोप घेतला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईतील पावसाचा मुक्काम संपल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दरम्यान, ऑक्टोबर हिटचे चटके बसून लागले आहेत. 

Updated: Oct 14, 2016, 09:49 PM IST
पावसाने मुंबईतून बाय बाय केले!, ऑक्टोबर हिटचे चटके title=

मुंबई : राज्यात परतीचा पाऊस कधी जाणार याची उत्सुकता होती. मात्र, मान्सूनने मुंबईकरांचा निरोप घेतला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईतील पावसाचा मुक्काम संपल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दरम्यान, ऑक्टोबर हिटचे चटके बसून लागले आहेत. 

राज्यात 15 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस सुरु होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होता. ऑक्टोबर उजाडला तरी पावसाने हजेरी लावल्याने पावसाळा लांबल्याची चर्चा होती. त्यात हवामान खात्यानेही पावसाळा संपल्याचे जाहीर केलेले नव्हते.
 
कोरडे हवामान आणि पावसाचा अभाव अशा काही अटी पावसाळा संपला हे जाहीर करण्यासाठी आवश्यक असतात, अशी माहिती हवामान विभागाचे व्ही. के. राजीव यांनी दिली. सध्या पश्चिमेकडून उत्तर-पूर्वेकडे वारा वाहत आहे आणि पावसाळा संपल्याचाच हा संकेत आहे, असे ते म्हणालेत.

यंदा मुंबईत पावसाचे आगमनही उशिराने झाले होते. या पावसाळ्यात एकूण 2507.0 मिमी पाऊस पडला. यात 453.9 मिमी जादा पावसाची नोंद करण्यात आली आहे.