‘ब्लू प्रिंट’ आली, कुणी नाही पाहिली!

१० सप्टेंबरला ९ वर्षांपासून प्रतिक्षित असलेली मनसेची ब्लू प्रिंट सादर न करणं, राज ठाकरेंना किती चुकीचं ठरलं, हे त्यांना काल घडलेल्या प्रकारानंतर राज ठाकरेंना वाटत असेल. कारण पितृपक्षामुळं आपल्या ब्लू प्रिंट सादर करण्याचा मुहूर्त राज ठाकरेंनी पुढे ढकलला, पण राज्यात झालेल्या राजकीय घटस्फोटामुळं या ब्लू प्रिंटची हवाही लागली नाही.

Updated: Sep 26, 2014, 03:08 PM IST
‘ब्लू प्रिंट’ आली, कुणी नाही पाहिली! title=

मुंबई: १० सप्टेंबरला ९ वर्षांपासून प्रतिक्षित असलेली मनसेची ब्लू प्रिंट सादर न करणं, राज ठाकरेंना किती चुकीचं ठरलं, हे त्यांना काल घडलेल्या प्रकारानंतर राज ठाकरेंना वाटत असेल. कारण पितृपक्षामुळं आपल्या ब्लू प्रिंट सादर करण्याचा मुहूर्त राज ठाकरेंनी पुढे ढकलला, पण राज्यात झालेल्या राजकीय घटस्फोटामुळं या ब्लू प्रिंटची हवाही लागली नाही.

एरव्ही राज ठाकरे बोलत असले की, सर्व माध्यमं न चुकता आणि इतर पक्षांचे नेते बोलत असतांना राज ठाकरेंना प्राधान्य देत दाखवत असायचे. पण 25 सप्टेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. शिवसेना-भाजपची 25 वर्षांची युती काल संपुष्टात आली तर काँग्रेस-राष्ट्रवादीची 15 वर्षांच्या आघाडीचाही काडीमोड झाला आणि राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटचं अनावरणाचं टायमिंगच चुकलं. 

अवघा महाराष्ट्र आठ वर्षांपासून राज ठाकरेंच्या या ब्लू प्रिंटची वाट पाहत होता. राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा होती. येणार म्हणता म्हणता राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटला 25 सप्टेंबरचा मुहूर्त मिळला. मुंबईतील ष्णमुखानंद सभागृहात राज ठाकरेंनी स्वतः ब्लू प्रिंट सादर केली. पण त्याचवेळी भाजप तसंच राष्ट्रवादीनं युती आणि आघाडी तुटण्याच्या अधिकृत घोषणा केली. त्यामुळं राज ठाकरेंना अपेक्षित मीडिया कव्हरेज मात्र मिळालं नाही. 

नेहमी अचूक टायमिंग साधणाऱ्या राज ठाकरेंना कालच्या घटनेमुळं नीट झोप लागली की नाही, हे सांगणं कठीण आहे. टायमिंग चुकल्यामुळं राज ठाकरेंची ब्लू प्रिंट आली, पण कुणीच नाही पाहिली... हे मात्र खरं!

आता राज ठाकरे आपल्या ब्लू प्रिंटच्या प्रमोशनसाठी काय फंडा वापरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.