म्हाडा ऑनलाईन अर्जासाठी इथं क्लिक करा

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर म्हाडाची १२५९ घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १ मे पासून म्हाडांच्या घरासाठीचे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2013, 08:11 AM IST

www.24taas.com, मुंबई
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर म्हाडाची १२५९ घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १ मे पासून म्हाडांच्या घरासाठीचे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. १ मे ला दुपारी दोन पासून ते २१ मे ला संध्याकाळी ६ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. तर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची अंतिम मुदत २२ मे आहे. ३१ मे रोजी म्हाडाची लॉटरी प्रसिद्ध होईल. एक्सीस बँकेच्या विविध शाखांमध्ये म्हाडाचा अर्ज स्विकारण्यात येईल.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर म्हाडाची १२ घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १ मे पासून म्हाडांच्या घरासाठीचे अर्ज म्हाडाच्या URL|mhada.lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. १ मे ला दुपारी दोन पासून ते २१ मे ला संध्याकाळी ६पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. तर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची अंतिम मुदत २२ मे आहे. ३१ मे रोजी म्हाडाची लॉटरी प्रसिद्ध होईल. एक्सीस बँकेच्या विविध शाखांमध्ये म्हाडाचा अर्ज स्विकारण्यात येईल.
यावेळी म्हाडानं घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्डस मोडलेत. या घरांच्या किंमतीनं सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झालेत. मालवणी इथल्या अत्यल्प गटासाठी फक्त १८० चौरस फुटांच्या घराची किंमत ७ लाख ८ हजार आहे. तर पवईजळच्या तुंगा इथल्या उच्च उत्पन्न गटाच्या ४७६ चौरस फुटाच्या घराची किंमत ही सगळ्यात जास्त आहे. तब्बल ७५ लाख २२ हजार ६२५ इतकी या घरांची किंमत आहे. तर सगळ्यात मोठं घर गोराई रोडमध्ये उच्च उत्पन्न गटासाठींचं आहे. ७४० चौरस फुटांच्या या घराची किंमत ६६ लाख रुपयांच्या घरात आहे. तर मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमतीही ४३ ते ५२लाख रुपयांच्या घरांत आहे.
म्हाडाची जाहिरात

.

.