देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी सचिन तेंडुलकरने घेतली पालिका आयुक्तांची भेट

चेंबूर जवळील देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरनं, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. 

Updated: Apr 22, 2016, 08:20 PM IST
देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी सचिन तेंडुलकरने घेतली पालिका आयुक्तांची भेट title=

मुंबई : चेंबूर जवळील देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरनं, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. 

अपनालय संस्थेमार्फत प्रश्न मार्गी!

सचिन तेंडुलकर याची सासू अनाबेला मेहता यांच्या अपनालय संस्थेमार्फत कचरावेचकांच्या प्रश्नाबाबत, एम ईस्ट वॉर्ड कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सचिन आणि आयुक्त दोघेही उपस्थित होते. 

सामान्य लोकांवर गुन्हे नकोत?

देवनार आग प्रकरणी सामान्य लोकांवर गुन्हे दाखल न करता, माफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी सचिननं केली.  कचरावेचक हे बीएमसीला मदत करणारे असल्याने त्यांना  देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचरा वेचण्यास परवानगी देण्याची मागणी सचिननं आयुक्तांकडं केली. 

आयुक्तांचे सकारात्मक उत्तर 

यावेळी आयुक्तांनी सकारात्मक उत्तर देत सचिनला मुंबई महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेसाठी मदत करण्याचे आवाहन केले. सचिननंही आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नि:शुल्क काम करण्याची तयारी दाखवली. 

देवनार आग प्रश्नावर संसदेत आवाज उठवणार असल्याचंही सचिननं म्हंटलंय.यापूर्वीही सचिननं आयुक्तांना देवनारप्रश्नी पत्र लिहून यातून मार्ग काढण्याचं आवाहन केलं होतं.