मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवीशी गुरूवारी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केलीत. यावेळी भाजप-शिवसेना सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.
अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. विरोधकांनी 'राम नाम सत्य है, सरकार बडी मस्त है', 'गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला, घोटाळा घोटाळा युती सरकारचा घोटाळा' अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज निदर्शने केली. कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी पायऱ्यांवर ठिय्या दिला.
शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, राज्य सरकारचा कारभार यावरुनही सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार जयंत पाटील, भाई जगताप, विखे पाटील, अजित पवार या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्र्यांना मागच्या दाराने विधानभवनात प्रवेश केला.
Mumbai: Congress and NCP MLAs protest at Maharashtra Assembly against state govt pic.twitter.com/FX5L3ensZh
— ANI (@ANI_news) March 10, 2016