मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्कामाप्रकरणी जेजे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना ईडीच्या विशेष न्यायलयानं दोषी ठरवलंय.
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये लहानेंच्या आशीर्वादानेच मुक्काम केल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. त्यामुळं भुजबळ लहानेंच्या मदतीनंच जेलबाहेर असल्याचा ठपकाही न्यायालयानं ठेवलाय. आता लहाने यांच्यावर काय कारवाई करावी याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयच ठरवेल असंही ईडी कोर्टानं सांगितलंय.
तब्बल ३५ पेक्षा जास्त दिवस छगन भुजबळ यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम केलाहोता. आणि हा मुक्काम जे जे चे डीन तात्याराव लहाने यांच्या आशिर्वादानेच भुजबळांनी केला होता हे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तसेच तात्याराव लहाने यांच्यावर काय करावी करावी या बाबत मुंबई उच्च न्यायालय ठरवेल असे आदेश विशेष इडी न्यायालयाने दिलेत.तात्याराव लहाने यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात तक्रार देखील केली होती. छगन भुजबळ हे आरामात राहतायेत त्यांना अनेक राजकीय त्याच गुन्हेगाराचे मंडळी भेटायला येतायेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय.
विशेष म्हणजे जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांच्या आशिर्वादाने जे जे हॉस्पिटलमधील कैदी वॉर्डमधून उपचार आणि वैद्यकीय चाचण्यांच्या बहाणे बाहेर काढले गेले होते असा आरोप अंजली दमानिया तात्याराव लहाने यांच्यावर केला होता.