मुंबई : मार्च 2017 मध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना दिली.
त्यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेलाही विचारलं जाईल. त्यांची सहमती असली तर विस्तारामध्ये शिवसेनेलाही सहभागी करुन घेतलं जाईल. अन्यथा त्यांच्याखेरीज विस्तार केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी या गप्पांत स्पष्ट केलं.
दरम्यान मार्च 2017 मध्ये सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं.