'...तर एसटी बसची भाडेवाढ सहन करावी लागेल'; शिंदेंच्या मंत्र्याकडून भाडेवाढीचं समर्थन

Gulabrao Patil On ST Bus Fare Hike: राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीबाबत निर्णय घेतला आहे. एसटीची भाडेवाढ 15 टक्के करण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 27, 2025, 09:43 AM IST
'...तर एसटी बसची भाडेवाढ सहन करावी लागेल'; शिंदेंच्या मंत्र्याकडून भाडेवाढीचं समर्थन title=
maharashtra news mla Gulabrao Patil support ST Bus Fare Hike

Gulabrao Patil On ST Bus Fare Hike: राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीनंतर राज्याभरात विविध प्रतिक्रिया येत आहेत. एसटीच्या तिकीटात साधारण 14 ते 15 टक्क्यांपर्यंत भाढेवाढ करण्यात आली आहे. एसटीच्या भाडेवाढीवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. तर, नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मात्र एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाडीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागणार असल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

एसटीच्या तिकीट दरात 15% ची वाढ करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 25 जानेवारी 2025 पासून एसटीची भाडेवाढ करण्यात आली आहे. यावरच मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जर आपल्याला नवीन बसेस हव्यात. जवळपास 5 हजार नवीन बसेस महाराष्ट्रात येत आहेत. 10-15 टक्के वाढ प्रवाशांनीही सहन करावी. जर सुविधा आपल्याला हव्यात आणि लक्झरी बससोबत तुलना करायची असेल ई-बसेस आणायच्या असतील तर थोडासा भार सहन करावा लागेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही प्रवाशांचा यामुळे फायदा होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

एसटीची भाडेवाढ का?

वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एसटीची भाडेवाढ करण्यात आली आहे, असं राज्य परिवहन प्राधिकरणाने नमूद केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

ठाकरे गट आक्रमक

राज्यातील एसटी भाडेवाडी विरोधात ठाकरे गट आक्रमक ठाकरे गटाकडून भाडेवाढीच्या विरोधात ठिकठिकाणी केलं जाणार आंदोलन अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन केले जाणार