अबब... २०२ कोटींचा एक पेंट हाऊस फ्लॅटचा झाला सौदा

दक्षिण मुंबईतील नेपीयन्सी रोड भागात एक ट्रिपलेक्स पेंट हाऊसचा २०२ कोटी रुपयांना सौदा झाला आहे. देशात रहिवासी अपार्टमेंटचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सौदा आहे. एका प्रमुख उद्योगपतीने या लक्झरी अपार्टमेंटच्या खरेदी करण्यासाठी सौदा केला आहे. 

Updated: Aug 8, 2015, 07:35 PM IST
अबब... २०२ कोटींचा एक पेंट हाऊस फ्लॅटचा झाला सौदा title=

मुंबई : दक्षिण मुंबईतील नेपीयन्सी रोड भागात एक ट्रिपलेक्स पेंट हाऊसचा २०२ कोटी रुपयांना सौदा झाला आहे. देशात रहिवासी अपार्टमेंटचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सौदा आहे. एका प्रमुख उद्योगपतीने या लक्झरी अपार्टमेंटच्या खरेदी करण्यासाठी सौदा केला आहे. 

हे अपार्टमेंट एका प्रोजेक्टच्या २०, २१ आणि २२ व्या मजल्यावर आहे. १७ हजार स्वेअर फूटचा कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट आहे. हे अपार्टमेंट रुणवाल ग्रुप करीत आहे. या पेंट हाउसमधून अरबी समुद्र आणि क्विन नेकलेसचा सुंदर दृश्य दिसते. यात २१ कार पार्किंग स्लॉट आहे. तसेच अपार्टमेंटमध्ये इतर सुविधा जसे लक्झरी क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल आहे. 

या उद्योगपतीने टोकन पेमेंट दिले आहे. याचे करार गेल्या आठवड्यात करण्यात आला. हे डील या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल. प्रति स्वेअर फुटाचा हिशेब केला तर ही डिल सर्वात महागडी असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी १ लाख २० हजार रुपये प्रति स्वेअर फूट देण्यात येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.