शाहरूखची चौकशी करणार - पोलीस

वानखेडेवरील शाहरुख प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शाहरुख खाननं ज्या मुलीला शिवीगाळ केली आणि मारहाण केलेल्या वॉचमनचा जबाब नोंदवून घेणार असल्याचं पोलीस सहआयुक्त इकबाल शेख यांनी म्हटल आहे.

Updated: May 17, 2012, 03:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

वानखेडेवरील शाहरुख प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शाहरुख खाननं ज्या मुलीला शिवीगाळ केली आणि मारहाण केलेल्या वॉचमनचा जबाब नोंदवून घेणार असल्याचं पोलीस सहआयुक्त इकबाल शेख यांनी म्हटल आहे.

 

शिवाय एमसीए आणि बीसीसीआयच्या ज्या अधिका-यांना मारहाण केली त्यांचाही जबाब घेणार असल्याचं शेख यांनी सांगितलंय. यांत दोषी आढळल्यास शाहरुखवर कडक कारवाई करण्यात येईल असं शेख यांनी स्पष्ट केले आहे. शाहरुखच्या वर्तणुकीवर एमसीएचे सर्वच अधिकारी नाराज असून एमसीएने त्यांचा निर्णय कळवल्यावर बीसीसीआय आपली भूमिमा स्पष्ट करेल असं रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.

 

तर दुसरीकडं शाहरुखला वानखेडेवर बंदी घालण्यात आल्याची माहिती एमसीएचे खजिनदार रवी सावंत यांनी सांगितलंय. त्यामुळं शाहरुखच्या वानखेडेवरील बंदीबाबत एमसीएतच मदभेद निर्माण झाल्याचं समोर आले आहेत. वानखेडे स्टेडियमवर काल रात्री मुंबई-कोलकाताची मॅच संपल्यानंतर नशेत गोंधळ घातल्याचा आरोप शाहरुखवर आहे.

 

कोलकता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या मॅचनंतर शाहरुख ड्रेसिंग रुममध्ये गेला त्यानंतर त्यानं वानखेडेवर घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार रवी सावंत यांनी केला. मॅच संपल्यानं मैदानावर जाण्यास सुरक्षारक्षकांनी शाहरुखला मनाई केली. त्यामुळं चिडून त्यानं आणि त्याच्या बॉडीगार्ड्सनी सुरक्षारक्षकांना  धक्काबुक्की केली आणि  एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांच्यासह पदाधिका-यांच्या नावे अपशब्द वापरल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.