परभणी गोठलं... ३.६ अंश तपमानाची नोंद!

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीयं. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. नाशिकमध्ये ६ अंश तर परभणीत सर्वात निचांकी म्हणजेच ३.६ अंश तपमानाची नोंद झालीय. 

Updated: Dec 19, 2014, 11:43 AM IST
परभणी गोठलं... ३.६ अंश तपमानाची नोंद! title=

मुंबई : उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीयं. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. नाशिकमध्ये ६ अंश तर परभणीत सर्वात निचांकी म्हणजेच ३.६ अंश तपमानाची नोंद झालीय. 

परभणी जिल्ह्यात तापमान ३.६ अंशापर्यंत घसरलंय. मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या थंडीची लाट आलीय. मराठवाड्यातील सर्वात नीचांकी तापमान परभणी जिल्ह्यात नोंदवलं गेलंय. हीच स्थिती येत्या काही दिवसात कायम राहणार असून तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्थानिक शेकोटी आणि ऊबदार कपड्यांचा आधार घेताना दिसतायत. तर गरम वाफाळलेल्या चहावर ताव मारण्याचे चित्र कार्यालयांमध्ये पाहायला मिळालं. 

नाशिक जिल्ह्यात तपमान ६ अंशांपर्यंत खाली घसरलंय. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तपमान चांगलंच खाली आल्यानं नागरिकांना यंदा प्रथमच कडाक्याच्या थंडी अनुभवायला मिळतेय. मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेतायत. 

नागपूरसह विदर्भात तापमान घसरलंय. तपमान साडेसहा अंश सेल्सियसच्या खाली आलंय. २०१२ साली नागपुरात ६.३ अंश सेल्सियस एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली होती. सध्या कमी झालेलं तपमान पाहता हा रेकॉर्ड तुटल्यास आश्चर्य वाटायला नको. विदर्भातल्या अन्य भागातही हेच चित्र आहे. उत्तरेकडे तपमान कमी झाल्यानं थंडी वाढल्याचं वेधशाळेनं म्हटलंय तर आगामी काही दिवसांत हे तपमान आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या नागपूर जणू काही हिल स्टेशन असल्याचं चित्र निर्माण झालंय. थंडीपासून रक्षण करण्यासाठी स्वेटरची मागणी वाढलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.