राज्यस्तरीय चित्र, शिल्प आणि फोटोग्राफी

शाळकरी मुलांच्या चित्रांपासून ते व्यावसायिक कलावंताच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतायत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 23, 2017, 09:12 PM IST
राज्यस्तरीय चित्र, शिल्प आणि फोटोग्राफी title=

पुणे : चित्र, शिल्प आणि फोटोग्राफी अशा विविध कलांचा मिलाफ असणारं कलाविश्व हे राज्यस्तरीय प्रदर्शन सध्या पुण्यातील घोले रोड आर्ट गॅलरीत सुरु आहे. शाळकरी मुलांच्या चित्रांपासून ते व्यावसायिक कलावंताच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतायत.

 शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि चित्रलिला निकेतन कला महाविद्यालयच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. राज्यभरातील 300हून अधिक कलाकारांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला.