दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

दहावीची परीक्षा आजपासून सुरुवात होतेय. राज्यातील ४ हजार २२२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Updated: Mar 3, 2015, 10:48 AM IST
दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा! title=

मुंबई : दहावीची परीक्षा आजपासून सुरुवात होतेय. राज्यातील ४ हजार २२२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. त्यामध्ये ९ लाख ५९ हजार ४५० विद्यार्थी तर ७ लाख ७३ हजार ४४८ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांना १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिकेचं वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिलीय.

त्याचबरोबर विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होत असल्यास जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देऊ शकतील, असंही त्यांनी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.