Worlds Worst and Best Airline : भारतात देशांतर्गत प्रवासासाठी सहसा इंडिगोच्या विमानसेवेला प्राधान्य दिलं जातं. भारतीयांच्या खिशाला परवडणारी सेवा आणि प्रवासादरम्यान दिल्या जाणाऱ्या सुविधा अनेकांना कमाल वाटत असल्या तरीही जागतिक स्तरावर मात्र याच भारतीय इंडिगो एअरलाईनला सर्वात वाईट श्रेणीत गणलं गेलं आहे.
'एअरहेल्प इंक'नं जगातील सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात निकृष्ट दर्जाच्या एअरलाईनसंदर्भातील वार्षिक विश्लेषण जारी केलं. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या अहवालानुसार जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यातील माहितीच्या आधारे ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. 'बिझनेस स्टँडर्ड'च्या वृत्तानुसार विमानसेवांची ही क्रमवारी जगभरातील ग्राहकांच्या प्रतिक्रिया, प्रत्येक विमानाचं वेळेवर उड्डाण यासह विमानात मिळणारे खाद्यपदार्थ, आरामदायी प्रवास, वैमानिक दल आणि विमानातील क्रू या निकषांवर निर्धारित करण्यात आली.
100. स्काय एक्सप्रेस
101. एयर मॉरीशस
102. टॅरोम
103. इंडिगो
104. पेगासस एयरलाइंस
105. एल अल इजरायल एयरलाइंस
106. बुल्गारिया एयर
107. नोवेलेयर
108. बज
109. ट्यूनिस एअर
1. ब्रुसेल्स एयरलाईन्स
2. कतर एयरवेज
3. यूनाइटेड एयरलाईन्स
4. अमेरिकन एयरलाईन्स
5. प्ले (आइसलँड)
6. ऑस्ट्रियन एयरलाईन्स
7. लॉट पोलिश एयरलाईन्स
8. एयर अरेबिया
9. विडेरो
10. एयर सर्बिया
असंख्य भारतीयांची पसंती असणाऱ्या इंडिगोला जगातील वाईट एअरलाईन्सच्या यादीत गणलं जाणं ही एअरलाईन्सच्या दृष्टीनं नकारात्मक बाब असून, आता याच नकारात्मक निकषांवर एअरलाईन्स काम करण्यावर भर देईल. दरम्यान, ब्रुसेल्स एअरलाईन्स ही जगातील सर्वात उत्तम एअरलाईन असून, ड्यूश लुफ्तान्झा एजीचाच ही एअरलाईन एक भाग असल्याचं सांगितलं जातं. 2018 पासून या सर्वोत्तम एअरलाईनच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या कतार एअरवेजला ब्रुसेल्स एअरवेजनं मागे टाकलं आहे.