मुंबई : माजी कामगारमंत्री आणि शिवसेना नेते साबीर शेख यांचे कल्याणमधील कोन गाव येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षे होते. त्यांनी अंबरनाथ मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.
साबीर शेख फक्त आमदार असताना कल्याणजवळच्या कोन गावातील एका चाळीत राहात होते. साबीर शेख अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांचे प्रदीर्ग आजाराने निधन झाले. ते शिवचरित्राचे ते अभ्यासक होते. शिवसेनेतील एकमेव मुस्लीम नेता, अशीही साबीर शेख यांची ओळख होती. मात्र, कार्यकर्त्यांसाठी फक्त साबीरभाई. तेव्हाच्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून साबीर शेख दोनदा आमदार म्हणून निवडून आले.
कामगार खात्याचे कॅबिनेट मंत्रीही झाले. त्यांच्या यशाची चढती कमान होती. पण तो चमत्कार नव्हता. त्यामागे त्यांची कठोर तपश्चर्या होती. दांडगा जनसंपर्क होता. रात्रीचा दिवस करण्याची तयारीही होती. कुणीही हाक मारल्यास मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभावच होता.
काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांनी साबीर शेख कसे विपन्नावस्थेत जीवन जगताहेत, याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्यांना काहींनी मदतीचा हात केला होता. मात्र पुन्हा त्यांची दयनीय अवस्था झाल्यानं औरंगाबादच्या `कल्पतरू` या संस्थेनं त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यांना कोन गावच्या घरातून औरंगाबादच्या ‘मातोश्री वृद्धाश्रम’ येथे नेण्यात आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.