कोल्हापूर : मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग असेल, असा विश्वास आज सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
शिवसेनेशी सत्ता सहभागाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा पाटील यांनी केलाय. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये सहभागी होणार का याची चर्चा आता सुरू झालीय.
राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यात शिवसेना सहभागी असेल, अशी शक्यता आहे. शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम होती. तर भाजपने ही मागणी फेटाळून लावत सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातूनही शिवसेनेने माघार घेतल्यामुळे संबंध जवळपास पूर्ण तुटले होते.
त्यातच विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदी विराजमान होत शिवसेनेने आपले इरादेही स्पष्ट केले होते. मात्र आता चंद्रकांतदादा पाटील यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना जोर मिळालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.