शिर्डी: साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरती पासच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मार्चपासून ही वाढ करण्यात येणार आहे.
1 मार्चपासून व्हीआयपी पासच्या दरांमध्ये 100 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे आता दर्शनासाठी 200 रुपये, काकड आरतीसाठी 600 रुपये आणि मध्यान्ह, धुपारती, शेजारतीसाठी 400 रुपये मोजावे लागणार आहेत.
गर्दीवर नियंत्रणासाठी संस्थानानं दर्शन आणि पासचं शुल्क आकारायला सुरुवात केली होती, पण भाविकांच्या संख्येमध्ये घट झाली नाही. संस्थानाला मात्र यामुळे कोट्यवधींचं उत्पन्न मिळालं.
वाढलेल्या दरांमुळे व्हीआयपी पासेसची संख्या कमी होईल आणि सामान्य दर्शनातील अडथळे कमी होतील, अशी अपेक्षा संस्थान व्यवस्थापनानं व्यक्त केली आहे.