पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलींचा लिफ्टमध्ये विनयभंग

पिंपरीमधल्या उच्चभ्रू पिंपळे सौदागरमध्ये एका वसाहतीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं अल्पवयीन मुलींचा लिफ्टमध्ये विनयभंग केला. निखील शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. 

Updated: May 18, 2015, 11:22 PM IST
पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलींचा लिफ्टमध्ये विनयभंग   title=

पिंपरी: पिंपरीमधल्या उच्चभ्रू पिंपळे सौदागरमध्ये एका वसाहतीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं अल्पवयीन मुलींचा लिफ्टमध्ये विनयभंग केला. निखील शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. 

सोसायटीमध्ये पिझ्झाची डिलिव्हरी करायला आलेल्या या तरूणानं खाली खेळत असलेल्या मुलींना लिफ्टमध्ये बोलवून त्यांच्याशी गैरवर्तन केलं. मुलींनी हा प्रकार घरात सांगितल्यावर पालकांनी पिझ्झा सेंटरवर धाव घेत निखील शिंदेला चोप दिला. 

मात्र या प्रकारानं परिसरात घबराटीचं वातावरण आहे. इमारतींमध्ये येणाऱ्या या डिलिव्हरी बॉईजवर कसा विश्वास ठेवायचा असा नागरिकांचा सवाल आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.