पिंपरी, पुणे : थंडी चांगलीच वाढल्यामुळे नॉन व्हेज पदार्थांना मागणी वाढलीय. त्यातच ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टमुळेही चिकन मटण फिशची मागणी वाढणार आहे. मात्र खवय्यांना त्याबाबत थोडीशी धक्कादायक बातमी. चिकनचे दर महागलेत.
ख्रिसमस किंवा ३१ डिसेंबरला तुम्ही मोठ्या चिकन पार्टीचा प्लान केला असेल तर तुमचा खिसा हलका होणार. भाजेपाल्या, डाळी नंतर बॉयलर चिकनच्या किमती वाढल्यात. चिकनच्या किंमतीमध्ये २० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत वाढ झालीय.
दोन दिवसांपूर्वी पुणे आणि परिसरात जिवंत कोंबडी १४० रुपये प्रति किलो विकली जात होती. आता ती १६० रुपये प्रति किलो झालीय. ड्रेस्ड चिकन १५० रुपये प्रती किलो होत ते १७० रुपयांवर गेलंय आणि अनड्रेस्ड चिकन १७० वरून १९० वर गेले आहे.
मागणी आणि पुरवठ्यामध्ये असलेली तफावती हे याचं मूळ कारण आहे. त्यातच कोंबड्यांना पुरवले जाणारं खाद्यही महाग झालंय त्याचाही परिणाम झालाय.