मुंबई : पंढरपूरमध्ये यापुढे तुम्ही कचरा टाकलात किंवा घाण केलीत तर तुमचे काही खरं नाही. पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय. त्याबाबत मुंबई हायकोर्टाने स्वच्छतेबाबत आदेश दिलेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी समिती नेमण्याची सूचना केलेय.
पंढरपूरमधील स्वच्छतेबाबत हायकोर्टानं जिल्हाधिकारी यांना एक समिती स्थापना करायला सांगितली आहे. ज्या समितीत जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नगरपरीषद मुख्याधिकारी, उप विभागाय अधिकारी यांचा समावेश असेल. ही समिती विशेष करुन सांडपाणी निचरा, पाणीपुरवठा यावर देखरेख करेल. तर पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली कायद्याच्या अमंलबजावणीवर लक्ष राहील.
जर कोणी अस्वच्छता केली तर त्यावर मुंबई पोलीस कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आदेश न्यायालयाने दिलेत. नदीच्या बाहेर तसंच पंढरपुरात ठिकठिकाणी कुंड्या ठेवाव्यात, अशाही सूचना करण्यात आली आहे. वारकरी संघटनेनं स्वयंसेवक वाढवावेत, अशीही सूचना करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.