नागपूर: चीनमध्ये तरुणांची सेक्सची मागणी पूर्ण करण्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत. म्हणूनच तिथं अत्याचार होत नाहीत, अशी मुक्ताफळं उधळलीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी... यादव इथंच थांबले नाहीत तर भारतात संस्कृती, धर्माच्या नावाखाली सभ्यतेला अक्षरश: पोखरून काढलयं.
त्यामुळं महिला अत्याचारही अधिक वाढलेत असंही ते म्हणालेत. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडालीये. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे शनिवारी आयोजित राजेंद्र माथुर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. 'सच दो टूक सच' अशा कठोर विषयावर त्यांनी भाष्य केलं.
धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली देशातील सत्यता लपवली जात असल्याचा थेट आरोप करीत शरद यादव म्हणाले, 'येरूसलेम ते बंगालच्या उपसागरापर्यंतच्या तथाकथित प्राचीन भारताचा हा प्रदेश देव, धर्माच्या नावाखाली आंधळा झाला आहे. धर्माच्या नावाखाली कत्तली सुरू आहेत. ३३ कोटी देव इथं नांदत असल्याचं सांगितलं जातं. मग एवढे कोट्यवधी देव असतानादेखील हा देश जगातील सर्वात सुखी देश का नाही, हा विचार गांभीर्यानं करण्याची गरज आहे.'
माजी खासदार दत्ता मेघे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांनी प्रास्ताविक केलं. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे डॉ. गिरीश गांधी यांनी आभार मानले. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.